मुंबई (प्रतिनिधी) : २६/११च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीने सांगितले होते की, हेडली तहव्वूर राणाचा एजंट म्हणून मुंबईत काम करत होता. राणाच्या प्रकरणाबाबत काय करायचं, याचा निर्णय केंद्र शासन आणि पोलीस यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
२६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेत अटक झाल्यानंतर सह्याद्री गेस्ट हाऊस येथे महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांच्यात तातडीची बैठक झाली. यावेळी देशमुख यांनी ही माहिती दिली.
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली. ५९ वर्षीय राणाला मुंबई हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झाली होती. अमेरिकेतही त्याला दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने मागील आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या तुरुंगातून ठरलेल्या शिक्षेपेक्षा आधीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
(PRAHAAR)