रायगड : मुंबई -गोवा महामार्गावर कशेडी घाटात खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 32 प्रवासी जखमी झाल्याचं समजतं. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारात हा अपघात झाला. जखमींना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेली माहिती अशी की, ही बस मुंबईहून देवगडला जात होती. कशेडी घाटात भोगावजवळ बस पोहोचली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट 50 फूट खोल दरीत कोसळली.
(PRAHAAR)