X Close
X
9819022904

कंगना राणौत पुन्हा बरळली, बायडन यांना ‘गजनी’ म्हणाली!


kangana ranaut 30-6-16

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती.

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी बाजी मारली असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, लवकरच जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यांची निवड होताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही जो यांचे अभिनंदन केले. अपवाद फक्त कंगना राणौत हिचा. होय, जो बायडन यांना ‘गजनी’ असा उल्लेख करत, कंगनाने लगेच एक ट्विट केले. तिचे हे ट्विट सध्या व्हायरल होतेय.

जो बायडन यांच्या विजयाची खिल्ली उडवत, तिने लिहिले, ‘गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक ५ मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट आहे. जेव्हा एक महिला पुढे जाते, तेव्हा आपल्यासोबत ती अन्य महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स.’

बायडन यांना ‘गजनी’ म्हणणे आणि त्यांचा डाटा क्रॅश होतो असे म्हणत कंगनाने बायडन यांच्या स्मरणशक्तीवर प्रहार केला आहे. ‘गजनी‘ या सिनेमात आमिरला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असल्याचे दाखवले होते. कंगनाच्या मते, बायडन हे सुद्धा विसरळभोळे आहेत. कंगनाच्या या ट्विटवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे बायडन यांच्या विजयावर ती खूश नाही. अर्थात अमेरिकन उपराष्ट्रपती निवड झालेल्या कमला हॅरीस यांच्या विजयावर मात्र तिने आनंद व्यक्त केला आहे.

(PRAHAAR)