X Close
X
9819022904

ओझोनचा थर पूर्वपदावर येण्यास सुरुवात


ozone

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने पाहता पाहता अवघ्या दोन-चार महिन्यांमध्ये संपूर्ण जगात थैमान घातले. लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागते. कित्येकांना यात आपले प्राणही गमवावे लागले. अशा या संपूर्ण परिस्थितीत संभाव्य हानी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून अनेक राष्ट्रांमध्ये सक्तीच्या लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. देशच्या देशच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश, जवळपास सगळीच हवाई वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक इतकेच नव्हे, तर नागरिकांचे दैनंदिन जीवनही ठप्प झाले.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी संपूर्ण जग एकवटले आहे. आपआपल्या परिने त्यांचा लढा सुरुच आहे. या सा-यामध्ये प्रत्येकजण एखाद्या दिलासादायक बातमीच्या शोधात आहे. सर्वत्र भीतीचे आणि नकारात्मक वातावरण पाहायला मिळत असतानाच आता एक अतिशय आनंदाची अशी माहिती समोर आली आहे. ज्याचा संबंध संपूर्ण मानव प्रजाती, सजीव सृष्टी किंबहुना संपूर्ण पृथ्वीशीच आहे. ही बातमी आहे ओझोनच्या थराची. पृथ्वीभोवती असणा-या ओझोनच्या थराचे आतापर्यंत झालेले नुकसान पाहता बरीच चिंता व्यक्त केली जात होती. पण, आता मात्र सागरी लहरी, ऋतूचक्र या सा-यावर थेट परिणाम करणारा ओझोनचा थर ब-याच अंशी पूर्वपदावर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक मानवी कृतींमुळे या ओझोनच्या थराचा ऱ्हास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सूयार्पासून निघणारी घातल किरणे शोषणा-या ओझोनच्या थराला छिद्रही झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, आता मात्र हे छिद्रही आपोआप भरत असल्याची बाब समोर येत आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरच्या संशोधकांच्या निदर्शनास आल्यानुसार पृथ्वीच्या दक्षिण भागात असणा-या अंक्टार्टिका भागावर असणा-या ओझोनच्या थरावरील छिद्र आता भरु लागले आहे. कारण, चीनच्या बाजून जाणारे प्रदूषण आता त्या दिशेला जात नाही.

(PRAHAAR)