X Close
X
9819022904

ऐकावे ते नवल! : कॅप्सूलच्या दोन रंगांमागील लॉजिक!


Mumbai:

आपण प्रत्येकाने कधी ना कधी कॅप्सूल खाल्ली असेलच! त्यामुळे प्रत्येकाला आराम नक्की मिळाला असेल. मात्र कॅप्सूल दोन रंगांमध्ये का असते, असा प्रश्न तुम्हाला पडला नाही. या दोन रंगांमागील लॉजिक काय आहे?

कॅप्सूल उघडून पाहिल्यास बाहेरून दोन्ही भाग समान आकाराचे वाटत असले तरी प्रत्यक्षात एकसारखे नसतात. एक भाग मोठा आणि दुसरा लहान असतो. मोठय़ा भागात लहान भागापेक्षा अधिक औषध असते. त्यामुळे मोठा भाग कंटेनर असतो. त्याला कॅप म्हणून छोटा भाग असतो. कॅप्सूल तयार करताना कॅप्सूल फिलिंग मशीनचा वापर केला जातो. या मशीनमध्ये मोठा भाग अर्थात कंटेनर खाली ठेवला जातो. त्यानंतर त्यात औषध भरले जाते. औषध भरून झाल्यानंतर कॅप्सूलचा लहान भाग अर्थात कॅप बसवली जाते.

संपूर्ण कॅप्सूलचा एकच रंग ठेवल्यास निर्मिती प्रक्रिया लाखो कॅप्सूल बनवताना गुंतागुंतीची ठरू शकते. एक भाग मोठा आणि एक भाग छोटा असला तरी एकाच रंगाच्या कॅप्सूलमुळे गोंधळ उडू शकतो. निर्मिती प्रक्रियेमध्ये गोंधळ उडू नये. कॅप्सूल योग्यरितीने भरली जावी म्हणून कॅप्सूलच्या दोन भागांना वेगवेगळा रंग दिले जातात.

कॅप्सूलला दोन रंग देण्याचे आणखी एक मानसशास्त्रीय कारण म्हणजे लहान मुले औषधांच्या गोळय़ा खाताना कुरकुर करतात. रंगीबेरंगी कॅप्सूल त्यांना एखादे चॅकलेट किंवा टॉफीसारखी वाटते. त्यामुळे आनंदाने कॅप्सूलचे सेवन करतात.