नवी दिल्ली : जीसॅट-११ या भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बुधवारी युरोपीयन अवकाश केंद्राच्या फ्रेंच गुयाना येथून करण्यात आले. संपर्क उपग्रह असलेल्या या उपग्रहामुळे दर सेकंदाला १०० जीबी ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-११ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने या उपग्रहाची तपासणी करण्यासाठी हा उपग्रह फ्रेंच गुयाना येथून माघारी बोलावला होता. हा निर्णय जीसॅट-६ए या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. २९ मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर जीसॅट-६ए हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यावेळी जीसॅट-११ चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर आज या उपग्रहाने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली.
An #Ariane5 launch is a thing of beauty! Watch (and re-watch) today’s liftoff with @ISRO’s GSAT-11 and GEO-KOMPSAT-2A for @kari2030, performed from the Spaceport in French Guiana. #VA246 pic.twitter.com/QGCFrKfcts
— Stéphane Israël (@arianespaceceo) December 4, 2018
(PRAHAAR)