नवी दिल्ली : आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरीत जवळपास लाखो भाविक दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषेत ट्वीट करीत, देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को आषाढ़ी एकादशी और चातुर्मास की हार्दिक शुभकामनाएं।
आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2019
‘आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना’ असे ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशातील नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. यासोबतच पंतप्रधानांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
T 3424 – आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🙏🙏🙏 pic.twitter.com/PybkQM3W4F
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2019
अमिताभ बच्चन यांनी देखील मराठी भाषेत ट्वीट करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विणा || माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || ||जय जय राम कृष्ण हरी|| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा’ असं ट्वीट बिग बींनी केले आहे.
(PRAHAAR)