X Close
X
9819022904

अरुण दूधवडकरांच्या बेकायदा बांधकामाचा पाठपुरावा करणा-या तरुणाची हत्या


bablu

मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करून त्याचा पाठपुरावा करणाºया बबलू दुबे या हिंदुत्ववादी तरुणाची मुंबईच्या घाटकोपर परिसरात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून सोमवार (२० मे) रोजी हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली असून, तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बबलू हा गोळीबार रोड परिसरात गाडीजवळ बसला होता. रिक्षातून आलेल्या तीन इसमांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि चाकूने वार केले. हल्ल्यानंतर तीनही मारेकºयांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनाथळी उपस्थित नागरिकांनी बबलू दुबेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माजी नगरसेवक अरुण दुधवडकर आणि नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांची अनेक अनधिकृत बांधकामे दुबे यांनी उघडकीस आणली होती. दुधवडकर यांचे ताडदेव येथील दिपक अपार्टमेंट, सुपारीवाला इमारतीत घर आहे. ते राहत असलेल्या ठिकाणी ताडदेव टॉवरजवळील वॅलेंटाईन स्पोर्टस क्लबला लागून एक वाढीव बांधकाम करण्यात आले आहे.

हे वाढीव अनधिकृत बांधकाम कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले आहे. दुधवडकर यांनीच क्लबच्या मोकळ्या मैदानावरील संरक्षक भिंतीवर अतिक्रमण करत बांधकाम केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. आरटीआयच्या माध्यमातून बबलू दुबे याने हे अनधिकृत बांधकाम उघडकीस आणून त्याचा पाठपुरावा केला होता.

२०१४ साली अरुण दुधवडकर यांनी आॅपेरा हाऊस मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत दुधवडकर यांचा दारुण पराभव झाला होता. त्या निवडणूकितही अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रतिस्पर्धी उमेदवाराने लावून धरल्याने दुधवडकरांचा पराभव झाला होता. दरम्यान बबलू दुबे याची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याचे कुटुंबीय शिवसेनेच्या एका नेत्याविरोधात लेखी तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचा हा नेता कोण? याची चर्चा सध्या मुंबईत सुरु आह

(PRAHAAR)