X Close
X
9819022904

अकरावी आॅनलाईन प्रवेश १९ जूनपासून, जागांमध्ये वाढ


online-admission

मुंबई : इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया १९ जूनपासून सुरू होणार असून राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागा वाढवण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जाहिर केला. विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढवण्यात आल्या आहेत.

मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात या जागा वाढवण्यात आल्या आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. विनोद तावडेंकडे असलेले शिक्षण खाते आशिष शेलारांना देण्यात आले. हे खाते हाती आल्यानंतर शेलार यांनी प्रथमच निर्णय घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरण्यात आले नाही. त्यामुळं दहावी निकालाची टक्केवारी कमालीची घसरली.  मात्र दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुण रद्द करण्यात आल्यामुळे आल्यानं अकरावी प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारनं अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

(PRAHAAR)