X Close
X
9819022904

Watch: अफगाणच्या संघाला पठाण बंधूंकडून दावत, रशीद खानचा खास व्हिडिओ व्हायरल


afganistan-84654

मुंबई: विश्वचषक २०२३ दरम्यान अफगाणिस्तानच्या संघाने माजी भारतीय ऑलराऊंडर इरफान पठाण आणि युसुफ पठाणच्या घरी भेट दिली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात इरफान पठाण अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर रशीदची गळाभेट घेताना दिसत आहे. व्हिडिओत पुढे रशीद खानला इरफान पठाणचा मोठा भाऊ आणि भारताचा माजी क्रिकेटर युसुफ पठाणचीही गळाभेट घेतली.

इरफान पठाण आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्रीबाबत बोलायचे झाल्यास इरफान पठाण आणि रशीद खान यांचा मैदानावरील डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तेव्हाचा होता जेव्हा अफगाणिस्तानने स्पर्धेत पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. यानंतर इरफान पठाण अफगाणिस्तानच्या प्रत्येक विजयावर डान्स करताना दिसला होता. या डान्सनंतर त्यांच्यातील मैत्री इतकी घट्ट झाली की भारताच्या माजी ऑलराऊंडरने अफगाणच्या संघाला घरी बोलावले.

इरफान आणि रशीद यांच्या गळाभेटीच्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाल्यास या व्हिडिओत अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू दिसत आहेत. याआधी इरफान पठाणने रशीदला श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर शुभेच्छा दिल्या होत्या. भारताच्या माजी ऑलराऊंडरने रशीद खानच्या पोस्टवर रिप्लाय करत लिहिले होते की, तुमच्या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानने गमावला जिंकलेला सामना

मंगळवारी अफगाणिस्तानने स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळला. अफगाणच्या संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी ५० षटकांत ५ बाद २९१ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग कऱण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने ९१ धावांत ७ विकेट गमावले. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार खेळीच्या जोरावर जबरदस्त कमबॅक करत विजय मिळवला. सहाव्या स्थानावर उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २०१ धावांची खेळी केली.

(PRAHAAR)