मुंबई : जागतिक योगा दिनानिमित्त सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. योगा, आसने याबाबत अधिकाधीक जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योगादिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागपूरमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची असलेल्या ज्योती अमगे हिने योगाचा सराव केला.
#WATCH World’s shortest woman, Jyoti Amge, practices Yoga in Nagpur, ahead of #InternationalYogaDay tomorrow. pic.twitter.com/whoCPhq4ab
— ANI (@ANI) 20 June 2019
योगा दिनानिमित्त घेण्यात येणारया शिबीरात ज्योति सहभाग घेणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ती सराव करत आहे. भारतात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच अलीकडे योगा, विविध आसने याबाबत जनजागृती करण्यात येत असून विविध वयोगटातील नागरिकांचा योगा करण्याकडे कल दिसत आहे.
नागपूरमधील रहिवासी ज्योतीच्या नावावर सर्वात कमी उंचीच्या महिलेचा रेकॉर्ड आहे. ज्योतीची उंची २ फूट ६ इंच एवढी आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीचे नाव झळकले आहे. आपल्या कमी उंचीमुळे ती जगभरात प्रसिद्ध आहे.
(PRAHAAR)