X Close
X
9819022904

Video : दिल्लीचा १४ धावांनी पराभव, सॅम करन-प्रिती झिंटाने केला मैदानातच भांगडा डान्स, हॅटट्रिक घेणा-या करनला दिले प्रिती झिंटाने आलिंगन


currum

मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव १५२ धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज सॅम करन याच्या हॅटट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्लीवर १४ धावांनी विजय मिळवला.

सामना जिंकल्यानंतर तंबूत परतत असताना सॅम करन आणि इतर सहका-यांनी सीमारेषेवर भांगडा नृत्य केले. त्यावेळी पंजाब संघाची मालकीण प्रिती झिंटा हीदेखील विजय साजरा करण्यासाठी मैदानावर आली. त्यावेळी तिनेदेखील करनसोबत भांगडावर ताल धरला. तसेच सामना जिंकून देणा-या करनला आलिंगन देऊन त्याचे अभिनंदनदेखील केले.

पंजाबच्या सॅमची हॅटट्रिक; दिल्लीचा १४ धावांनी पराभव

पंजाबच्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव १५२ धावांत आटोपला. त्याआधी दिल्लीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते.

पंजाबच्या संघाने ख्रिस गेलच्या जागी सॅम करन याला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. मात्र तो १० चेंडूत २० धावा करून पायचीत झाला. पंजाबची ३ बाद ५८ अशी स्थिती असताना डेव्हिड मिलर आणि सरफराझ खान यांनी संघाला डाव सावरले. सरफराझने २९ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावा केल्या. तर मिलरने ३० चेंडूंत ४३ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये मनदीप सिंगने नाबाद २९ धावांची दमदार खेळी केल्याने पंजाबने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या बदल्यात १६६ धावा केल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अश्विनने पृथ्वी शॉला शून्यावर झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत दिल्लीला अर्धशतकी मजल मारून दिली. कॉलिन इन्ग्राम (२९ चेंडूत ३८ धावा) आणि रिषभ पंत (२९ चेंडूत ३९ धावा) यांनी दमदार फटकेबाजी केली. मात्र, पंत बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र पालटले आणि अवघ्या ८ धावांमध्ये दिल्लीच्या ६ विकेट्स पडल्या. १४ चेंडूत ११ धावा देऊन ४ बळी टिपणारा सॅम करन सामनावीर ठरला.

(PRAHAAR)