X Close
X
9819022904

Video: मुक्ता बर्वे दिसणार पोलीस अधिका-याच्या भूमिकेत


mukta-barve

मुंबई : महिला सुरक्षेचा प्रश्न आजही महाराष्ट्रात ऐरणीवर आहे. महिलांच्या सुरक्षेचं हे विदारक सत्य आणि इथली भयानक परिस्थिती आगामी ‘बंदिशाळा’ या चित्रपटात मांडण्यात येणार आहे. विविध भूमिकांच्याद्वारे आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे या चित्रपटात पोलीस अधिकारयाच्या भूमिकेत दिसणार आहे. परिस्थितीचं कुठलंच दडपण न घेता बिनधास्तपणे त्या दंगलीला भिडणारी पोलीस अधिकारी माधवी सावंतची भूमिका मुक्ताने साकाराली आहे.

या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रवी जाधव दिग्दर्शीत ‘रंपाट’ या चित्रपटासोबत ‘बंदिशाळा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वाती संजय पाटील यांनी केली असून दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनून बेधडकपणे करारी मुक्ता उसळलेल्या दंगलीत घुसून दंगलखोरांना आपला इंगा दाखवताना या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते. रुबाबदार पोलिस वर्दीतल्या मुक्ताने गुन्हेगारीचा समुळ नायनाट करण्याचा विडा उचलला असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. मुक्ताचा यापूर्वी कधीही पाहिला नाही असा अवतार या चित्रपटात असल्याचे पहायला मिळत आहे. या भूमिकेतला मुक्ताचा दरारा खिळवून ठेवणारा आहे.

या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच उमेश जगताप, शरद पोंक्षे, विक्रम गायकवाड, हेमंगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत पाहुणी कलाकार कृतिका गायकवाड यांची विशेष भूमिका आहे.

(PRAHAAR)