X Close
X
9819022904

Team india: रोहितनंतर हा खेळाडू बनू शकतो शुभमन गिलचा सलामीवीर सहकारी


415499-cricket-gen-700

मुंबई: टीम इंडियाचा(team india) नियमित कर्णधार रोहित शर्मा(captain rohit sharma) आता आशिया कपमध्ये(asia cup) आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. तो शुभमन गिलसोबत(shubhman gill) डावाची सुरूवात करू शकतो. यानंतर भारतीय संघाच्या यजमानपदाखाली वर्ल्डकपची स्पर्धा रंगणार आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा या फॉरमॅटमध्ये कमी प्रमाणात दिसू शकतो. याचे कारण त्याचे वाढते वयही आहे. तो सध्या ३६ वर्षांचा आहे. अशातच गिलचा नवा सलामीवीर सहकारी कोण बनणार?

तीनही फॉरमॅटमध्ये ठोकलेय शतक

युवा फलंदाज शुभमन गिलने आपल्या आतापर्यंतच्या क्रिकेट करिअरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक ठोकली आहेत. त्याला भारताचा भावी स्टार मानले जात आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी आशिया कपसाठी त्याची संघात निवड झाली आहे. आयपीएल असो वा भारतीय संघात गिल नेहमीच सलामीवीराची भूमिका निभावतो.

रोहितच्या सलामीबाबत असं म्हणाला गिल

पंजाबचा २३ वर्षीय शुभमन गिलने सांगितले की त्याची आणि कर्णधार रोहित शर्माची फलंदाजीची शैली वेगवेगळी आहे मात्र त्याची सलामीची जोडी यशस्वी आहे. आगामी आशिया कपमध्ये भारतीय संघाच्या विजयाची कमान यांच्या सलामीच्या जोडीवर असणार आहे. गिल आणि रोहितने वनडेमध्ये ९ सामन्यांमध्ये ६८५ धावा केल्या आहेत.

कोण असणार पार्टनर

रोहित जेव्हा निवृत्त होईल अथवा फॉरमॅटमध्ये कमी खेळेल तेव्हा शुभमन गिलचा सलामीवीर सहकारी इशान किशन असेल असे बोलले जात आहे. इशान विकेटकीपिंगही करतो आणि त्याने भारतीय संघासाठी विकेटकीपिंग केले आहे.

(PRAHAAR)