X Close
X
9819022904

Special : ‘जी-२०’ जाहीरनाम्यात स्टार्टअप्सना अग्रस्थान


09-1420794326-modi-myanmar45-6909

प्रत्येक राष्ट्राच्या उदयोन्मुख गरजा आणि मूल्यप्रणाली यांच्याशी सुसंगत अशी विभाजित तरीही सामूहिक भविष्याची निर्मिती करताना स्टार्टअप्स हे नवोन्मेष प्रेरित आर्थिक उभारी, पुनर्रचना आणि वाढीसाठी इंजिन बनले आहेत. (Special) जागतिक स्टार्टअप अर्थव्यवस्था ही ९० ट्रिलियन डॉलरच्या एकूण जागतिक अर्थव्यवस्थेपैकी जवळजवळ ३ ट्रिलियन १ डॉलरची आहे आणि ती झपाट्याने वाढत आहे.

नावीन्यता जोपासत वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीला प्रतिसाद देणारी स्टार्टअप्सची भूमिका महामारीच्या काळात निखालसपणे स्पष्ट झाली. जिने केवळ मनुष्यहानी टाळण्यात हातभार लावला नाही, तर आर्थिक उभारीला  पूर्वपदावर नेण्यात ती अग्रेसर होती. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नवोन्मेष वृद्धीसाठी स्टार्ट अप्स हे मोठ्या प्रमाणात मंच आणि साधने उपलब्ध करून देत आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात अर्थव्यवस्थांना मदत करत आहेत. अशा प्रकारे, रोजगार निर्मिती, तंत्रज्ञानातील प्रगती, दीर्घकालीन वाढ आणि पेचप्रसंगातील व्यवस्थापनाच्या बाबतीत ते जगात महत्त्वाची भूमिका बजावतात.

सन २०२३ मध्ये भारताच्या जी-२० च्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेला स्टार्टअप-२० कार्यरत गट हा स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी आणि स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, गुंतवणूकदार, नवोन्मेष संस्था आणि इतर प्रमुख परिसंस्था हितधारक यांच्यातील समन्वय सक्षम करण्यासाठी जागतिक आदर्श ठरण्याची मनीषा बाळगतो. भारताची स्टार्टअप परिसंस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी परिसंस्था असून त्यात १०७२ युनिकॉर्न, ८३,००० हून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आणि त्यांना समर्थन देण्यासाठी सतत विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप-२० कार्यरत गटाच्या माध्यमातून, भारत जी-२० राष्ट्रांमधील धोरणात्मक सहकार्याद्वारे नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा विकसित करण्यात जगाला सहाय्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. जी-२० राष्ट्रांपैकी प्रत्येक देश आपली स्वतःची स्टार्टअप परिसंस्था तयार करत असताना, हा गट स्टार्टअप अर्थपुरवठा प्रारूप सक्षम करण्यासाठी आणि विशेषत: जागतिक महत्त्व असलेल्या क्षेत्रांसाठी आखणी आणि सहनिर्मितीसाठी एकत्र काम करेल.

१) स्टार्टअप जीनोम
२) भारतीय युनिकॉर्न स्थिती

या कार्यरत गटाच्या स्थापना वर्षासाठी, भारताचे तीन सर्वसाधारण आधारस्तंभ पुढीलप्रमाणे :

१. स्थापना आणि विस्तार : जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये स्टार्टअप्स आणि त्यांच्या कार्याच्या अनेक व्याख्या आहेत. पहिल्या आधारस्तंभाद्वारे, स्टार्टअप २०चा पाया मजबूत करण्याकरिता स्टार्टअप्ससाठी हँडबुक तयार करण्यासाठी, सर्वानुमते – आधारित व्याख्या आणि शब्दावलीचे मूल्यांकन केले जाईल. शिवाय, जी २० अर्थव्यवस्थांमधील स्टार्टअप परिसंस्थेच्या हितधारकांमध्ये जागतिक विस्तार वाढवण्यासाठी आराखडा तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हे देखील या आधारस्तंभाचे उद्दिष्ट आहे.

२. वित्तपुरवठा : दुसरा आधारस्तंभ हा स्टार्टअपला वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी धोरणे आणि आराखड्यावर लक्ष केंद्रित करेल आणि नेटवर्किंग आणि पुढे जायच्या संधी प्रदान करून एक सहाय्यक वातावरण तयार करेल.

३. सर्वसमावेशकता आणि शाश्वतता : तिसरा आधारस्तंभ प्रमुख शाश्वतता विकास उद्दिष्ट तफावत संबोधित करणाऱ्या स्टार्टअपला गती देण्यासाठी किंवा इतर सर्व राष्ट्रांच्या समान हिताच्या क्षेत्रात ज्या गटांच्या समावेशासाठी विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रित करेल.(उदा. महिला उद्योजक, दिव्यांग व्यक्ती)

जी-२० राष्ट्रांमध्ये स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्याची आपली मागणी साध्य करण्यासाठी कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजन करण्याची स्टार्टअप २० ची संकल्पना आहे. २८ जानेवारी २०२३ रोजी (हैदराबाद येथे) उद्घाटन कार्यक्रम आणि ३ जुलै २०२३ (गुरुग्राम येथे) रोजी शिखर परिषद होणाऱ्या या उपक्रमांचा कालावधी सहा कार्यक्रमांमध्ये असेल. या कालावधीत भारताच्या विविध भागांमध्येही बहुविध कार्यक्रम प्रस्तावित आहेत. याशिवाय, भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचे जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी भव्य स्टार्टअप प्रदर्शन आयोजित करण्याचा विचार आहे.

या कार्यरत गटाद्वारे, जी-२० राष्ट्रांद्वारे सामान्यतः मान्य केलेल्या शिफारशी मांडणारे अधिकृत धोरण परिपत्रक संकलित करून सादर केले जाईल. याशिवाय, उपरोक्त परस्पर संवादातून निर्माण होणारी मार्गदर्शक तत्त्वे, सर्वोत्तम पद्धती, आराखडा आणि धोरणात्मक शिफारसींवरील अनेक प्रकाशने देखील सादर केली जातील. तसेच, अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यास आणि या सहभागातून मिळणारे परिणाम हाताळण्यास सक्षम असलेले ‘जागतिक नवोन्मेष केंद्र’ उभारण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे.

जी-२० अध्यक्षपदाच्या माध्यमातून, ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ ही भावना जगासमोर आणण्याची भारताची संकल्पना आहे. त्याच भावनेने, स्टार्टअप २० कार्यरत गट हा स्टार्टअपला समर्थन देण्यासाठी आणि सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण सहभागाद्वारे त्यांना आपल्या सामूहिक भविष्याचा एक भाग बनवण्यासाठी जागतिक आदर्श ठरून तो चिरस्थायी राहण्याची आकांक्षा बाळगतो.

-डॉ. चिंतन वैष्णव

The post Special : ‘जी-२०’ जाहीरनाम्यात स्टार्टअप्सना अग्रस्थान first appeared on .

(PRAHAAR)