मुंबई : आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzealand) सामना सुरु आहे. कर्णधार रोहित शर्मा ४७ धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने वादळी खेळीला सुरुवात केली होती.
विराटच्या साथीने गिलने १२.३ षटकांतच संघाचे शतक धावफलकावर लावले. गिलने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र, आपला हा दमदार डाव अर्ध्यावर सोडत गिलला काही काळ मैदानाबाहेर थांबावं लागणार आहे. क्रॅम्प आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात फटकेबाजी करत आहे.
श्रेयस अय्यर मैदानात आला त्यावेळी भारताची धावसंख्या १ बाद १६५ धावा इतकी होती.
(PRAHAAR)