X Close
X
9819022904

Shahrukh Khan 58th Birthday: बर्थडेच्या आधीच शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी, पाहा व्हिडिओ


Shah-Rukh-Khan
मुंबई: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरूख चाहत्यांची संख्या जगभरात काही कमी नाहीये. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांचा प्रचंड मोठा वर्ग गोळा केला आहे. त्याची एक झलक मिळवण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. २ नोव्हेंबरला किंग खान आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानच्या चाहत्यांसाठी त्याचा वाढदिवस हा एखाद्या सणापेक्षा काही कमी नसतो. यातच किंग खानचा वाढदिवस सुरु होण्याआधीच चाहत्यांनी मन्नतबाहेर गर्दी केली. शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले चाहते हजारो चाहते एकद दिवस आधीच त्याच्या घराबाहेर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पोहोचले होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत किंग खानचे चाहते त्याच्या घराबाहेर दिसत आहेत. या दरम्यान ते जोरजोरात We Love You Shah Rukh आणि हॅपी बर्थडे शाहरूख खान असे म्हणताना दिसत आहेत. चाहत्यांच्या चेहऱ्यावर किंग खानच्या ब्रर्थडेचा आनंद दिसत आहे.   Shah Rukh Khan at Mannat waving at fans Happy Birthday King Khan #HappyBirthdaySRK pic.twitter.com/B1X0VdoPW1 — Syed Irfan Ahmad (@Iam_SyedIrfan) November 1, 2023 शाहरूखच्या बर्थडेला मिळणार खास सरप्राईज २ नोव्हेंबरला शाहरूख ५८ वर्षांचा होईल. या खास दिवशी किंग खान गिफ्टही देणार आहेे. शाहरूखच्या वाढदिवसी त्याचा बहुप्रतिक्षित सिनेमा डंकीचा टीझर लाँच होणार आहे. यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावणार नाही. बॉक्स ऑफिसवर शाहरूखच्या सिनेमांची धमाल कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शाहरूखने या वर्षी दोन सगळ्यात मोठे ब्लॉकबस्टर सिनेमे पठाण आणि जवान केले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला. आता तो राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये दिसणार आहे. (PRAHAAR)