X Close
X
9819022904

S. Yadav WC Fianle 2023 : एकमेव आशा असलेला सूर्याकुमारही मैदानाबाहेर!


415499-cricket-gen-700

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताची अत्यंत निराशाजनक कामगिरी सुरु आहे. एकमेव आशा असलेल्या सूर्याकुमार यादवनेही निराशाच केली आहे. २८ चेंडूंमध्ये अवघ्या १८ धावांवर तो बाद झाला. भारताचा स्कोअर ९ बाद २२६ धावा राहिला.

भारताच्या अगदी काही वेळातच पटापट विकेट्स पडल्या. दमदार सुरुवात केलेला भारत नंतर मात्र संथ खेळायला लागला आणि चाहत्यांच्या पदरी चांगलीच निराशा पडली आहे. भारताचा पहिला फलंदाजी करण्याचा डाव काहीसा फसला आहे. आता भारताच्या गोलंदाजांनी काही जादू केली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतील.

 

 

(PRAHAAR)