मुंबई : मुंबईत आजही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाने आज ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(PRAHAAR)