X Close
X
9819022904

Punjab Accident : पंजाबमध्ये तब्बल शंभर गाड्या एकमेकांवर आदळल्या!


accident 12-8-16

अपघाताचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

पंजाब : देशभरात प्रदूषणाचे (Pollution) प्रमाण प्रचंड वाढले असून ही बाब फार चिंताजनक आहे. अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवत आहेत, तर दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी श्वास घेतानाही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, शारीरिक समस्या उद्भवत असतानाच आता प्रदूषणामुळे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये प्रदूषणाने दृश्यमानता कमी झाल्यामुळे चालकांना गाडी चालवताना समोरचे नीट दिसले नाही आणि तब्बल १०० गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात (Punjab Accident) झाला.

पंजाबमध्ये लुधियाणामधील खन्ना येथे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास १०० वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त वाहनांमध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींची नेमकी संख्या समोर आली नाही. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारांकरता दाखल करण्यात आले आहे.

सुमारे २०-२५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्रदूषणाची वाढती समस्या

दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये प्रदूषणाची मोठी समस्या आहे. यातच गेले काही दिवस शेतकरी शेतातील तण जाळत आहेत. तसेच फटाकेही मोठ्या प्रमाणावर वाजवले जात आहेत. याचा परिणाम थंडीतल्या धुक्यांत धूळ, धुर मिळून धुरक्यात होत आहे. यामुळे रात्रीचीच नाही तर दिवसाचीही दृष्यमानता कमी होत आहे.

(PRAHAAR)