X Close
X
9819022904

PSI exam : पोलीस उपनिरीक्षक भरती परिक्षेत ५२ परीक्षार्थी कायमस्वरूपी डिबार


Board Exams UP-8UJ4383

२०१९ मध्ये घेण्यात आल्या होत्या परीक्षा

बंगळूर : हल्ली परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी दहावी-बारावीच्या परिक्षेतही विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी चुकीची पद्धत वापरल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे २१ जानेवारी २०१९ रोजी कर्नाटक बोर्डाकडून ५४५ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या लेखी परिक्षेत काही परीक्षार्थीकडून बेकायदा कृती करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी आता पोलिस खात्याकडून त्या सर्व ५२ परीक्षार्थीना कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षकांच्या या भरती परिक्षेत गैरवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे कोणत्याही प्रकारच्या पोलिस खात्यातील परीक्षेत (Police Recruitment Exam) सहभागी होता येणार नाही, असा आदेश पोलिस महासंचालक कमल पंत आणि आर्थिक गुन्हे शाखा बंगळुरु यांनी जारी केला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिस उपनिरीक्षक (नागरी) पदासाठी ५४५ पुरुष आणि महिला जागांसाठी भरतीचे आयोजन ३ ऑक्टोबरपासून करण्यात आले होते. सकाळी अकरापासून दुपारी साडेबारापर्यंत दोन टप्प्यात राज्यातील सात केंद्रामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येत होती. याअंतर्गत बंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, तुमकूर जिल्हा आणि दावणगिरी जिल्हा अशा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या.

सीआयडीने (CID) हाती घेतलेल्या तपासात परीक्षार्थींनी लेखी परीक्षावेळी ब्लूटूथ (Bluetooth) आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा (Electronic device) उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. त्याचबरोबर इतर परीक्षार्थींनी गैरमार्गातून ओएमआरसीट मिळवल्यामुळे लेखी परीक्षा बेकायदा ठरवली गेली होती. याप्रकरणी बंगळूर, गुलबर्गा, हुबळी-धारवाड, आणि तुमकुर शहरासह विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले व सीआयडीने तपास करून दोषारोप दाखल केला होता. यातील ५२ परीक्षार्थीना आता कायमस्वरूपी डिबार करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

 

(PRAHAAR)