पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू येथील एका २९ वर्षीय आदिवासी महिलेवर तिच्या मालकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी शेतमालक आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ च्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेने २०२१ पासून आरोपीच्या शेतात काम केले आणि त्याने तीन वर्षांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिला धमकावले. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तपास अद्यापही सुरु आहे.
(PRAHAAR)