जालना : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सोळा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता अंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचे उपोषण आज सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(PRAHAAR)