X Close
X
9819022904

Madhuri Dixit Panchak : माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ सिनेमात तगड्या मराठी कलाकारांची फौज!


चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) धक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) दसऱ्यानिमित्त तिच्या आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’ची (Marathi movie Panchak) घोषणा केली होती. ‘बकेटलिस्ट’ (Bucket List) या चित्रपटातून माधुरीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मितीही तिने केली होती. आता पुन्हा एकदा माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) आपल्या ‘पंचक’ या आगामी चित्रपटासोबत मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक खास व्हीडिओ शेअर करून या जोडप्याने त्यांच्या या आगामी मराठी चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली. हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार्‍या मराठीतील तगड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच आनंद इंगळे (Anand Ingale), नंदिता पाटकर (Nandita Patkar), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi), भारती आचरेकर (Bharati Acharekar), सतीश आळेकर (Satish Alekar), सागर तळाशीकर, दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar), दीप्ती देवी (Dipti Devi), संपदा जोगळेकर (Sampada Jogalekar), आशिष कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. एकंदरीतच या सिनेमात प्रेक्षकांना दमदार कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

माधुरीने दसऱ्याच्या दिवशी या सिनेमाची घोषणा करत लिहिलं होतं,”दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही ‘पंचक’ या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहोत. जयंत जठार आणि राहुल आवटे हा सिनेमा दिग्दर्शित करत असून आमची ही दुसरी निर्मिती आहे. एका अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवासाठी सज्ज व्हा. ५ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr Shriram Nene (@drneneofficial)

 

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी निर्मित केलेला तो पहिला मराठी चित्रपट होता. आता त्यांच्या ‘पंचक’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. माधुरीची ‘द फेम गेम’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

(PRAHAAR)