नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदा भारताची इकॉनॉमी ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली आहे. यासोबतच भारत जगातील चौथा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारताचे ५ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी मिळवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी दरात ७.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. शक्तीकांत दास यांनी ३१ ऑक्टोबरला केलेल्या विधानात म्हटले होते की आर्थिक गतिविधी पाहता काही सुरूवातीचे आकडे समोर आले आहे यामुळे मला आशा आहे नोव्हेंबरच्या अखेरीस दुसऱ्या तिमाहीदरम्यान येणारे जीडीपीचे आकडे नक्कीच हैराण करणारे असतील.
जीडीपी लाईव्हचे आकडे पाहून समजते की भारताने १८ नोव्हेंबरच्या रात्री उशिराच हे ध्येय गाठले आहे होते आणि पहिल्यांदा भारताने ४ ट्रिलियन डॉलर आकडा पार केला आहे. दरम्यान, भारत आता चौथ्या पायरीपासून दूर आहे. आता जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी आहे आणि भारत आणि जर्मनीदरम्यानचे अंतर खूप कमी आहे.
भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यांची अर्थव्यवस्था २६.७ ट्रिलियन डॉलर आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार १९.२४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. तिसऱ्या स्थानावर जपान आहे. त्यांची अर्थव्यवस्था ४.३९ ट्रिलियन डॉलर आहे. जर्मनी याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे तर त्यांची अर्थव्यवस्था ४.२८ ट्रिलियन डॉलर आहे.
(PRAHAAR)