अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने दिलेले २४१ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पूर्ण करु शकेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भारताच्या गोलदाजांना पटापट विकेट्स काढणे अत्यंत गरजेचे आहे.
भारताने हळूहळू आपली चमकदार कामगिरी दाखवयला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. मिचेल मार्श १५ चेंडूंत १५ धावा काढून बाद झाला. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर स्टिव्ह स्मिथला बुमराहने अवघ्या चार धावांवर बाद केले.
असं असलं तरी ऑस्ट्रेलिया तुफान फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २ बाद ४१ धावा होता. तर सातव्या षटकात ऑस्ट्रेलिया २ बाद ४७ धावांवर राहिला.
(PRAHAAR)