X Close
X
9819022904

ICC Cricket World Cup: आता चार वर्षे आणखी प्रतीक्षा, जाणून घ्या पुढील वर्ल्डकपबद्दल सर्व माहिती


Mumbai:

मुंबई: वर्ल्डकप २०२३चा सोहळा नुकताच संपला आहे. फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय चाहत्यांना वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी पुन्हा चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. वनडे क्रिकेटमध्ये पुढील वर्ल्डकप २०२७मध्ये होणार आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. तीनही देशांनी मिळून वर्ल्डकपचे यजमानपद सांभाळणार आहेत.

हे दुसऱ्या असेल जेव्हा आफ्रिकेच्या महाद्वीरमध्ये वर्ल्डकप खेळवला जाईल. याआधी वर्ल्डकप २००३चे आयोजन आफ्रिकेत झाले होते. तेव्हा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह केनियाने वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन केले होते. त्यावेळेस दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे ग्रुप स्टेजमधून बाहेर गेले होते. तर केनियाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. सेमीफायनलमध्ये केनियाला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

२० वर्ष आधी आफ्रिकेत झालेला हा वर्ल्डकप भारतासाठी अविस्मरणीय ठरला होता. १९८३नंतर टीम इंडिया पहिल्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. दरम्यान, तेव्हाही ऑस्ट्रेलियाच्या हातून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

यजमान असल्याने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेला वर्ल्डकप २०२७मध्ये खेळता येणार आहे. मात्र नामिबियासोबत असे होणार नाही. त्यांना आपली पात्रता वर्ल्डकपसाठी सिद्ध करावी लागेल.

किती संघ घेणार भाग

पुढील वर्ल्डकपमध्ये १४ संघ सहभागी होतील. यातील दोन संघ ठरलेले आहेत. यानंतर निर्धारित वेळेपर्यंत आयसीसी वनडे रँकिंगमधील टॉप ८ संघांना सरळ वर्ल्डकपचे तिकीट मिळेल. बाकी चार संघ क्वालिफायर्सच्या माध्यमातून या स्पर्धेत जागा मिळवतील.

वर्ल्डकप २०२७मध्ये ७-७ संघ दोन ग्रुपमध्ये विभागले जातील. यातील राऊंड रॉबिन स्टेजनंतर दोन्ही ग्रुपमधील टॉप ३ संघ पुढील स्टेजमध्ये पोहोचतील. दुसऱ्या राऊंडमध्ये ६ संघ अतील. प्रत्येक ग्रुपमधील संघ दुसऱ्या ग्रुपच्या सर्व संघांसोबत एक एक सामना खेळतील. या पद्धतीने या राऊडमध्ये प्रत्येक संघ तीन तीन सामने खेळतील. या स्टेजमध्ये दोन संघ एलिमिनेट होतील आणि नंतर सेमीफायनलमध्ये सामना खेळवला जाईल.