तेल अवीव: हमास(hamas) आणि इस्त्रायल(israel) यांच्यात ११व्या दिवशी युद्ध सुरूच आहे. यातच हमासने मोठा दावा केला आहे की मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास इस्त्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयत अल अहलीवर हवाई हल्ला केला. यात ५०० जणांचा मृत्यू झाला.
न्यूज एजन्सी एपीच्या माहितीनुसार जर या हल्ल्याला दुजोरा देण्यात आला तर २००८ नंतर हा सगळ्यात घातक इस्त्रायलचा हवाई हल्ला असेल. एपीच्या माहितीनुसार अल अहलीच्या रुग्णालयाच्या फोटोमध्ये हॉलमध्ये आग लागली आहे. काचा तुटल्या आहेत आणि मृतदेह पसरलेले दिसत आहेत.
दरम्यान, इस्त्रायलच्या लष्कराने दावा केला आहे की हा हल्ला कऱण्यामागे इस्लामिक जिहादचा हात होता हे सिद्ध करण्यासाठी फुटेज प्रसिद्ध करतील. याशिवाय इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला माहीत असले पाहिजे की गाझाच्या रुग्णालयात केलेला हा हल्ला दहशतवाद्यांनी केला होता इस्त्रायलच्या सैन्याने नाही.
शेकडो मृत्यूचे कारण बनण्याचे कारण म्हणजे गाझाची अनेक रुग्णालये लोकांसाठी शेल्टर होती. याआधी इस्त्रायलच्या सेनेने उत्तर गाझा येथे राहणाऱ्या लोकांना जागा खाली करण्याचा इशारा दिला होता. यामुळे मोठ्या संख्येने विस्थापन पाहण्यात आले.
७ ऑक्टोबरला दहशतवादी संघटना हमासने दक्षिण इस्त्रायलवर जोरदार हल्ला केला होता.
यात इस्त्रायल शहर तेल अवीव आणि अश्कलोन येथे सायरनचा आवाज ऐकू आला. तेव्हापासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्हीकडून आतापर्यंत या युद्धात तब्बल ४७००हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.