Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ फेब्रुवारी २०२३
दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- स्वतंत्र व्यावसायिकांचे उत्कर्ष होतील. वृषभ– आर्थिक बाजू भक्कम राहील, कुटुंब परिवारात कार्य ठरू शकते. मिथुन- इतरांबरोबर वाद-विवाद करू नका, मानवी उपद्रव होऊ शकतो. कर्क- नोकरीमध्ये राजकारण तसेच गटबाजीपासून त्रास संभवतो. सिंह– तरुणांना स्पर्धात्मक यश मिळेल. कन्या– कुटुंब परिवारातील मुला-मुलींच्याबद्दल असलेल्या चिंता जातील. तूळ– नवीन वाहन खरेदी करू शकाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. वृश्चिक– मानसिक अस्वस्थता जाणवणाऱ्या घटना घडू शकतात, शांत रहा. धनू– नोकरीतून परदेशी जाण्याचे नियोजन होऊ शकते. मकर– तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल. कुंभ– सभा-समारंभाची निमंत्रणे मिळतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. मीन– जुन्या गुंतवणुकांमधून विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो. (PRAHAAR)