X Close
X
9819022904

Gaza Camp Fire : गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीला आग; २१ जणांचा मृत्यू


gaza03022018051645

नवी दिल्ली : गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीतील चार मजली इमारतीला आग (Gaza Camp Fire) लागल्याची घटना घडली. यात २१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. अपघातग्रस्त इमारतीमध्ये पेट्रोलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. यामुळेच आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करुन राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. तसेच एक दिवसाचा शोकही जाहीर करण्यात आला आहे.

The post Gaza Camp Fire : गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीला आग; २१ जणांचा मृत्यू first appeared on .

(PRAHAAR)