X Close
X
9819022904

Ganapath: टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ सिनेमाचे पोस्टर लाँच


Mumbai:

मुंबई: बॉलिवूडचा फिटनेस फ्रीक टायगर श्रॉफ (tiger shroff) सध्या गणपत सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो पुन्हा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टमध्ये टायगर एकदम रावडी अंदाजात दिसत आहे. टायगरचा हा लूक गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच लाँच करण्यात आला आहे. या पोस्टरसह सिनेमाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली.

रिलीज झाले टायगरच्या सिनेमाचे गणपत पोस्टर

गणपतचे हे नवे पोस्टर टायगर श्रॉफने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. यात टायगर आपल्या हाताला बांधलेल्या लाल पट्टीत दिसत आहे. यावर आग लागलेली दिसत आहे. पोस्टरमध्ये टायगरचा अतिशय इंटेन्स लूक दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना टायगरने लिहिले की, उसको कोई क्यो रोकेगा, जब बाप्पा का है उसपे हाथ, आ रहा है गणपत, करने एक नये दुनिया की शुरूवात. दसऱ्याला २० ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होत आहे.

 

कृती सॅनॉन दिसणार सोबत

टायगर श्रॉफच्या या सिनेमात त्याच्यासोबत कृती सॅनॉन दिसणार आहे. तब्बल ९ वर्षांनंतर दोघे एकत्र दिसत आहे. याआधी ही जोडी हिरोपंती या सिनेमात एकत्र दिसली होती. या दोघांचा हा पहिला सिनेमा होता.

२० ऑक्टोबरला रिलीज होणार सिनेमा

हा सिनेमा २० ऑक्टोबरला हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत जगभरात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.