X Close
X
9819022904

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेचे न्यायालयाचे आदेश


167215-donald-trump

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर २०२०च्या जॉर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली.

न्यायालयाने ट्रम्प यांच्या अटकेचे निर्देश दिल्यानंतर इतर १८ साथीदारांना आत्मसमर्पण करण्यासाठी शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ग्रँड ज्युरी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एकुण १३ आरोप ठेवले असून यामध्ये जॉर्जियाचा निवडणूक निकाल बदलण्याचा कट, रिको, खोटी कागदपत्रं दाखल करणे, सार्वजनिक अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचे उल्लंघन यासोबतच इतरही आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच जॉर्जियाच्या खासदारांचे मतांतर करणे, फसवणूक, बोगस दावे केल्याचा आरोपही आहे.

ट्रम्प यांचा पराभव मान्य केला नव्हता. यामुळे जाणून बुजून, बेकायदेशीरपणे निकालांचे पराभव ट्रम्प यांच्या बाजूने बदलण्याच्या कटामध्ये ट्रम्प यांच्यासह १८ साथीदार सहभागी असल्याचे आरोपपत्रात फॅनी यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात ट्रम्प यांच्यासह व्हाईट हाऊसचे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज, न्यूयॉर्कचे माजी मेयर रुडी गिउलियानी आणि ट्रम्प सरकारमधील न्याय विभागाचे अधिकारी जेफरी क्लार्क यांचा समावेश आहे.

दरम्यान, ट्रम्प यांची २० जानेवारी २०२१ पासून राष्ट्राध्यक्ष करण्याची योजना आखली जात होती. त्याचवेळी मतांची मोजणी रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले असल्याचेही फॅनी यांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

(PRAHAAR)