X Close
X
9819022904

Delhi Rain: दिल्ली-NCRमध्ये अचानक बदलले हवामान, पावसामुळे प्रदूषणाची पातळी घसरली


13_01_2015-14train1a

नवी दिल्ली: दिवाळी च्या आधी दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान बदलले आहे. दिल्ली, नोएडापासून गाझियाबाग आणि फरीदाबादपर्यंत हवामानात अचानक बदल पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर रात्रभर या ठिकाणी हलका पाऊसही झाला. दिल्ली-एनसीआरच्या काही भागात हलका पाऊस पाहायला मिळाला.

यामुळे राष्ट्रीय राजधानीत वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे काही काळ दिलासा मिळाला आहे. कर्तव्य पथ आणि दिल्ली-नोएडा सीमेजवळील भागांमध्ये हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पाहायला मिळाला. संपूर्ण एनसीआरमध्येही पावसाने हजेरी लावल्याने वातावरण अतिशय स्वच्छ झाले आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये अशा वेळेला पाऊस झाला जेव्हा प्रदूषणाने या ठिकाणी धोक्याची पातळी गाठली होती. या ठिकाणी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून कृत्रिम पावसाची तयारी करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय केजरीवाल सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र निसर्गानेच दिल्लीवर कृपा केली आणि पाऊस बरसला.

एएनआयने जाहीर केलेल्या व्हिडिओत दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीशिवाय नोएडा, गाझियाबाद, गुरूग्राम आणि फरिदाबाद या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळाला.

गुरूवारी काय होती दिल्लीची स्थिती?

दिल्लीत गुरूवारी वायूची गुणवत्ता पातळी अतिशय धोक्याची होती. दरम्यान वातावरण अनुकूल असल्याची शक्यता असल्याने दिवाळीआधी हवेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. २४ तासांतील हवेची गुणवत्ता पातळी दररोज संध्याकाळी ४ वाजता सादर केली जाते. गुरुवारी वायूची गुणवत्ता पातळी ४३७ होती, तर बुधवारी ही पातळी ४२६ होती.

(PRAHAAR)