पुणे : राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच पुण्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयातील मुलींच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता याच महाविद्यालयात ख्रिश्चन प्रार्थना घेतली जाते, असा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केली आहे. प्राचार्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.
डी. वाय. पाटील महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तसेच महाविद्यालयात ख्रिश्चन प्रार्थना घेतली जाते असे आरोप बजरंग दलाने केले आहेत. हे सगळे प्रकार थांबवून प्राचार्यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अशी मागणी करत बजरंग दलाने प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण केली. हा गोंधळ उडताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेशे दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र यासंदर्भात मौन बाळगलं आहे. त्यामुळे लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरे बसवण्यात आले होते की नाही, याबाबत स्पष्ट कळू शकलेले नाही.
(PRAHAAR)