X Close
X
9819022904

cricket: सामना पाहण्यास घेतली होती सुट्टी, मॅच हरल्याने तरूणाने केली आत्महत्या


Mumbai:

कोलकाता: गुजरातच्या अहमदाबाद स्थित नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेटनी हरवले होते. या पराभवाने दुखी पश्चिम बंगालच्या एका २३ वर्षीय तरूणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याबाबतची सूचना मृत तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुडा जिल्ह्यातील बेलियाटोर ठाणे क्षेत्रात सिनेमा हॉलजवळ रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल लोहार असे या मृत तरूणाचे नाव आहे.

कपड्याच्या दुकानात काम करत होता मृत तरूण

राहुलचे नातेवाईक उत्तम सूरने सांगितले की तो त्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. फायनल पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती. सूरने सांगितले की ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाने तो खूप दु:खी होता. त्यामुळेच त्याने आपल्या खोलीत फाशी घेत जीव दिला.

पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण केले दाखल

सूर यांनी दावा केला की त्याच्या जीवनात कोणतीही अशी समस्या नव्ती. पोलिसांनी सांगितले की राहुलचे शव सोमवारी पोस्टमार्टेमसाठी बांकुडा सम्मिलानी मेडिकल कॉलेज तसेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले. त्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा घरात कोणी नव्हते. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही विधान न करता सांगितले की तपास सुरू आहे.