कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखले केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सौरवला सौम्य कार्डियक अरेस्ट झटका बसला आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. गांगुलीच्या प्रकृतीसंदर्भात अद्याप अपडेट आले नाहीत.
(PRAHAAR)