मुंबई : २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि संगीतकारांसह पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्यास बंदी घालण्यात (Ban on Pakistani artists) आली होती. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी उठवण्यात आली आहे.
काही दिवसांपुर्वी एका सिनेकर्मीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्याने भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात माहिरा खान, फवाद खान यांसारख्या कलाकारांना भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Patriotism Is In Devotion To Country, Not Enmity Towards Another: Bombay HC Dismisses Plea To Ban Indian Filmmakers From Engaging Pakistani Artists | @AmishaShriv https://t.co/S3qEUpW3LB
— Live Law (@LiveLawIndia) October 19, 2023
लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे की, ”देशभक्ती ही देशावर असलेल्या भक्तीमध्ये आहे, त्याचा अर्थ दुसऱ्याशी शत्रुत्व करणे असा होत नाही.” न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, या याचिकेत योग्यता नाही आणि भारत सरकारने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे हा निर्णय एक दिलासा आहे. यामुळे सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांततेत वाढ होईल.
या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमर अशा लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय सिनेमांमध्ये अभिनय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(PRAHAAR)