मुंबई: दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा वर्ल्डकपची फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक पद्धतीने तीन विकेटनी हरवले. पहिल्या डावात पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेने २१२ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने ३ विकेट राखत विजय मिळवला.
डेविड मिलरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर आफ्रिकेने २१२ धावा केल्या. मात्र त्यांची ही धावसंख्या त्यांना विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. या निराशाजनक पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमा खूपच निराश झाला.
या सामन्याशी संबंधित गोष्टी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मी ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा देतो. फायनलसाठी ऑल दी बेस्ट. त्यांची या सामन्यावर पकड होती. ते या विजयाचे हकदार होते. ही एक डॉग फाईट होती.
बावुमा म्हणाला, आम्हाला सुरूवातीला चांगली गोलंदाजी करायची होती. दरम्यान आम्ही पुनरागमन केले. शम्सीने चांगला खेळ केला. आम्ही चांगली टक्कर दिली मात्र योग्य करण्याची गरज होती. दरम्यान काही संधी आम्ही वाया घालवल्या. स्मिथला विकेट घेत आम्ही सामन्यात होतो.
(PRAHAAR)