X Close
X
9819022904

Assembly Elections 2023: मध्य प्रदेशातील २३० आणि छत्तीसगडमधील ७० जागांवर मतदान सुरू


93231-elections24042019100400

नवी दिल्ली: मध्य प्रदेशाती २३० आणि छत्तीसगडमधील ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला पार पडले आहे. मध्य प्रदेशात २ हजार ५३३ आणि छत्तीसगडमध्ये ९५८ उमेदवारांच्या नशिबाचा फैसला ईव्हीएममध्ये आज कैद होईल. निवडणूक आयोगाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

तब्बल ६४ हजार ६२६ मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नक्क्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडसह राज्यातील निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर लागणार आहे.

आधी मतदान, मग जलपान

गृहमंत्री अमित शाह यांनी लोकांना घरातून बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अमित शाह म्हणाले, अध्यात्म आणि संस्कृतीचा वारसा असलेल्या मध्य प्रदेशची प्रगती आणि येथील जनतेच्या हितांचे रक्षण केवळ एक मजबूत राष्ट्रवादी सरकार करू शकते. मध्य प्रदेशच्या विकास आणि सुशासनासाठी मतदान करा. तसेच इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करा. आधी मतदान करा आणि मग जलपान करा.

पंतप्रधान मोदींनीही केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले की आज मध्य प्रदेशच्या सर्व विधानसभेच्या जागांसाठी मतदान केले जाणार आहे. मला विश्वास आहे की राज्याच्या प्रत्येक क्षेत्रातील मतदार जल्लोशात मतदान करतील आणि लोकशाहीच्या पर्वाची शोभा वाढवतील. या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणांना विशेष शुभेच्छा.

(PRAHAAR)