नवी दिल्ली : देशभरात १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या दिग्गज नेत्यांनी लष्कराप्रती आपला सन्मान आणि आदर जाहीर करत सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त केले आहेत.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक क्षणी जागरुक असणाऱ्या देशातील पराक्रमी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं लष्कर बलवान, धैर्यवान आणि दृढ आहे. ज्यांनी नेहमीच भारताची शान अभिमानाने उंचावले आहे. मी सर्व देशवासियांच्या वतीने भारतीय सैन्याला अभिवादन करतो.
मां भारती की रक्षा में पल-पल मुस्तैद देश के पराक्रमी सैनिकों और उनके परिजनों को सेना दिवस की हार्दिक बधाई। हमारी सेना सशक्त, साहसी और संकल्पबद्ध है, जिसने हमेशा देश का सिर गर्व से ऊंचा किया है। समस्त देशवासियों की ओर से भारतीय सेना को मेरा नमन।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय की, सैन्य दिनानिमित्त भारतीय सैन्यातील सर्व शूर पुरुष आणि महिला जवानांना शुभेच्छा. आम्हाला त्या सर्व जवानांची आठवण येते ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत नेहमीच धैर्यवान आणि सामर्थ्यवान सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचे आभारी आहे. जय हिंद
गृहमंत्री अमित शहा यांनीही सैन्य दिनी भारतीय सैन्याच्या धैर्य आणि त्यागाबद्दल आभार मानले आहेत. गृहमंत्र्यांनी म्हटलंय की, भारतीय सैन्य शोर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. मी देशाच्या सूर सैनिकांच्या त्यागाला अभिवादन करतो, सैनिकांची नि:स्वार्थ सेवा आणि देशाबद्दल समर्पक यामुळे देशवासियांसाठी सैन्य अभिमान आहे. लष्कर दिनानिमित्त शूर सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनापासून शुभेच्छा…
भारतीय सेना शौर्य और पराक्रम की प्रतीक है।
देश के बहादुर सैनिकों के अदम्य साहस और बलिदान को नमन करता हूं। राष्ट्र के प्रति उनकी नि:स्वार्थ सेवा और समर्पण पर सभी देशवासियों को गर्व है।
हमारे वीर जवानों, पूर्व सैनिकों और उनके परिवारों को ‘थल सेना दिवस’ की हार्दिक शुभकामनाएं
(PRAHAAR)