X Close
X
9819022904

Afghanistan: अफगाणिस्तानात नवा फतवा, आता स्त्रियांविरोधी घेतला ‘हा’ निर्णय…


afganistan-84654

नवी दिल्ली : तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून तेथील सर्वसामान्य नागरिकांचे जिवन कष्टमय झाले आहे. तालिबान सरकार दररोज नवनवीन प्रतिगामी निर्णय घेत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा अश्मयुगात जातोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. तालिबानने एक नवा फतवा काढला असून मुलींना तिसऱ्या वर्गाच्या पुढे शिकण्यावर बंदी आणली आहे.

तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना याबाबत इशारा दिला आहे. याआधी तालिबानमधील मुलींना सहावीच्या वर्गापर्यंत शिकण्याची परवानगी होती, पण त्यात आणखी घट करण्यात आली आहे. बीबीसीने यासंदर्भातील रिपोर्ट देताना म्हटले आहे की, तालिबान सरकारमधील शिक्षणाधिकाऱ्यांनी गजनी प्रांतातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना इशारा दिला आहे. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तिसरीपर्यंतच मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी असेल. तालिबान सरकारच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील महिला सामाजिक कार्यक्षेत्रातून हद्दपार होण्याची शक्यता आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
(PRAHAAR)