X Close
X
9819022904

Mumbai Local news: गणेशोत्सवादरम्यान रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही


Mumbai:

मुंबई: गणेशोत्सव(ganeshostav) केवळ एका दिवसावर येऊन ठेपल्याने सगळीकडेच उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मुंबईतही गणेशोत्सवाचे वेगळेच वातावरण पाहायला मिळते. त्यातच मुंबईकरांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

गणेशोत्सवादरम्यान कोणत्याच रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी दिली. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळेल.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मोठी गर्दी असते. देशभरातून लोक दक्षिण मुंबईच्या परळ, लालबाग तसेच अनेक भागांमध्ये मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे रेल्वे मार्गांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी शनिवारी तसेच रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. यावरून लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच हा मेगाब्लॉक रद्द केला जावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार रेल्वेने आता हा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.