X Close
X
9819022904

Accident : नाशिकमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चौघांचा मृत्यू


Mumbai:

नाशिक : नाशिकमध्ये कार आणि कंटेनर समोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) नगरसेवकासह चार जणांचा मृत्यू झाला. चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील (Dhule) रहिवासी आहेत.

या अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धुळे येथील हे चार प्रवाशी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. दरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. मात्र इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही.

अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.