X Close
X
9819022904

…तर सनीला गुरूदासपूर मतदार संघातून लढू दिले नसते : धर्मेंद्र


dharmendra-sunny

मुंबई : भाजपामध्ये प्रवेश केलेला अभिनेता सनी देओल गुरूदासपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे. या निमित्ताने सनीचा प्रचार जोरदार सुरू असताना दरम्यान सनीचे वडील धर्मेंद्र यांनी आश्चर्यकारक विधान केले आहे. ‘जर सनी गुरूदासपूरमध्ये काँग्रेस खासदार सुनील जाखड याच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याचे मला आधी माहित असते तर या मतदार संघातून मी त्याला निवडणूक लढवू दिली नसती’ असे मत धर्मेंद्र यांनी मांडले आहे.

बलराम जाखड हे माझ्या भावासारखे आहेत. त्यांचा मुलगा सुनील जाखड गुरूदासपूरमधून निवडणूक लढवत असल्याचे मला आधीच माहित असते तर सनीला सुनीलच्या विरोधात उभे राहू दिले नसते, असेही ते पुढे म्हणाले. सनीची पार्श्वभूमी ही मुळात चित्रपट क्षेत्राची आहे, त्यामुळे एका अनुभवी राजकीय नेत्या विरोधात त्याची लढत सोपी नाही असेही ते पुढे म्हणाले.

भाजपद्वारे गुरूदासपूरमधून तिकीट मिळाल्यानंतर सनीचा प्रचार जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे सनीच्या ‘गदर’ चित्रपटातील प्रख्यात हॅन्डपंपचे दृश्य पाहता सनीचे अनेक चाहते प्रचारादरम्यान त्याला हॅन्डपंप भेट म्हणून देत आहेत. सनीला नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता मला खूप आनंद झाला असल्याचेही धर्मेंद्र पुढे म्हणाले. गुरूदासपूरसाठीचे मतदान १९ मेला होणार असून हा सातवा आणि शेवटचा टप्पा आहे.

(PRAHAAR)