X Close
X
9819022904

…जेव्हा भिमरावांचे गाणे ऐकण्यासाठी सूर्य अस्ताला जाताना थांबतो


Mumbai:

प्रहार वेब

हेमंतकुमार कुळकर्णी

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे मराठी- मालवणीतील सिद्धहस्त लेखक. तर गझलनवाज भीमराव पांचाळे हे गझलेतील मोठे नाव. हे दोघे एकत्र भेटतात आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या मारवा रागातील गाणे ऐकण्याचा योग येतो. माडबनच्या किनाऱ्यावर सूर्य बुडत असताना त्यांनी ‘राहिले अजून  श्वास किती’ हि मारवा रागातील गझल गायली आणि जणू सूर्य ही अस्ताला जाताना थांबला.

गंगाराम गवाणकर यांनी दोघी , वन रूम किचन , वर परीक्षा , वर भेटू नका , वस्त्रहरण ही नाटके लिहिली यातील वन रूम किचन चे एक हजारपेक्षा जास्त प्रयोग झाले तर वस्त्रहरणाचे महाराष्ट्रात अगणित प्रयोग झाले. त्यांची ऐसपैस कादंबरी रसिकांना भावली. चित्रगंदा हा रवींद्रनाथ टागोर यांचा लेख संग्रह त्यांनी अनुवादित केला. व्हाया वस्त्रहरण ही आत्मकथा त्यांचे  जीवनचरित्र सांगते. असा हा लेखक हा राजापूर तालुक्यातील माडबन या मूळ गावी आला होता.

तर भीमराव पांचाळे हे देवगडमध्ये खाजगी कार्यक्रमाला आले होते. शंभरहून जास्त गझलांना स्वरसाज देणारे गझल गायकीतले भीष्माचार्य , तसेच गावागावातील गझलकाराना आपल्या गायकीतून व्यासपीठ देणारे भीमराव पांचाळे हे त्यांच्या क्षेत्रात बाप आहेत.

देवगड पासून अर्ध्या पाऊण तासावर असलेल्या माडबन येथे जाऊन भीमराव पांचाळे यांनी गवाणकर यांची भेट घेतली. आपापल्या क्षेत्रातील हे दोन दिग्गज भेटले आणि माडबनच्या किनाऱ्यावर  भीमराव पांचाळे यांनी स्वर लावला. मारवा रागातील राहिले अजून श्वास किती  ही गझल त्यांनी गायली. यावेळी सूर्य अस्ताला जात होता, तो जणू मारवा ऐकण्यासाठी थांबला. आम्ही हे क्षण प्रहार चा वाचकांसाठी घेऊन आलो आहोत