X Close
X
9819022904

२०३२ ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये होणार


Los-angeles-to-host-2028-summe-olympics-12-09-17

सिडनी (वृत्तसंस्था): आगामी २०३२मध्ये होणारे ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये होईल. यामुळे ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर यजमानपद मिळाले आहे.

२०३२ ऑलिम्पिक यजमानपदाची बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. त्यांना तिसऱ्यांदा यजमानपद मिळाले आहे.

आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करू. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कसे केले जाते हे आम्हाला माहीत आहे, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.

२०२४ मधील ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजलिस येथे होणार आहेत. ब्रिस्बेन हा नवीन बिडिंग सिस्टमचा पहिला विजेता आहे. नवीन नियमांनुसार, आयओसी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठी काही बळकट देशांची निवड करते. त्यानंतर मतदानासह यजमान देश निवडला जातो. ब्रिस्बेन यजमान म्हणून घोषित होताच ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला.

(PRAHAAR)