X Close
X
9819022904

१० वर्षांनंतर मिळाले वारकरी भवन; ठाण्यातील वारकऱ्यांची प्रतीक्षा संपली


Ebola-Vaccine-2015

ठाणे (वार्ताहर) : खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात ठाणे पालिकेमार्फत उभ्या राहिलेल्या वारकरी भवनाच्या इमारतीतील ताबा अखेर वारकऱ्यांना मिळाला आहे. गेल्या १० वर्षांपासून वंचित असणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वारकरी भवनाचा ताबा मिळण्यासाठी देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी भवनाचे उद्घाटन एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्या हस्ते झाले.

ठाणे शहरातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात असत. ठाणे शहरात वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ठाणे शहरात वारकरी भवन होण्याची इच्छा होती. खासदार राजन विचारे त्यावेळी तत्कालीन नगरसेवक असताना त्याचा पाठपुरावा करून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संत गजानन महाराज चौक, राम मारुती रोड, नौपाडा येथे वारकरी भवनाच्या इमारतीची निर्मिती करण्यात आली. या कामाचे भूमिपूजन सन २००७ साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते, त्यानंतर तयार झालेल्या इमारतीचे लोकार्पण १९ डिसेंबर २०११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते; परंतु शहर विकास विभागाकडे ताबा न मिळाल्याने इमारत तयार होऊन देखील धूळ खात पडली होती. सदर वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे, दुसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे व तिसरा मजला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा या संस्थांना देण्यासाठी ठाणे पालिकेने दि. २० ऑक्टोबर २०१६ रोजी एकमताने ठराव करण्यात आला होता; न्यायालयीन कामकाजासाठी महानगरपालिकेने वारकरी भवनाची इमारत ६ ते ८ महिन्यांच्या मुदतीवर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाला देण्यात आली होती.

(PRAHAAR)