X Close
X
9819022904

सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणा-या तरुणाला चोपले


supriya1
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणा-या तरुणाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडल्याची घटना कोल्हापुरात घडली. एका बातमीवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द तरुणांने वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय तांबवेकरच्या घरी पोहचले आणि त्याला चोप देत माफी मागायला लावली. सोशल मिडीयावरून आक्षेपार्ह कमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेय यांच्याबद्दल कमेंट करणा-या घाटकोपर येथील एका तरुणाला मनसैनिकांनी बदडले होते. आता कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर या तरुणाला सुप्रिया सुळेंविषयी फेसबुक अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढले आहे. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रावादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. ईव्हीएम नको, अशी होती बातमी ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याविषयीच्या बातमीची पोस्ट संबंधित एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाऊंटवरुन करण्यात आली होती. त्याखाली कमेंटमध्ये अक्षयने सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला जाब विचारले. यापुढे कोणत्याही महिलेविषयी अपशब्द वापरणार नाही. मी माझे अकाऊंट डिलीट केले आहे, याबाबत जी कारवाई होईल त्याला मी जबाबदार असेन असे पत्र त्याच्याकडून लिहून घेतले. यानंतर असा प्रकार केला तर पुन्हा बदडू असा दम त्या तरुणाला देण्यात आला. facebook-comment-ncp leader supriya-sule (PRAHAAR)