X Close
X
9819022904

साध्वी प्रज्ञासिंह बरळल्या, हेमंत करकरेंचा सर्वनाश होईल असा श्राप दिला होता


pradnya-sadhvi

भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी एटीएसचे प्रमुख शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक विधान केले. निरपराध संन्याशांना तुरुंगात डांबण्यात आले. यावर मी सर्वनाश होईल असा श्राप करकरेंना दिला होता. आणि त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे, असे साध्वींनी म्हटले आहे.

 

भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी हे विधान केले. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. साध्वी म्हणाल्या, मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले, असेही त्या म्हणाल्या.

साध्वींनी आरोप केला की, पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. साध्वीला सोडणार नाही असे, हेमंत करकरे म्हटले होते. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा यांनी केले आहे. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की साध्वीला सोडून द्या. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.
साध्वी प्रज्ञासिंह बरळल्या,

(PRAHAAR)