X Close
X
9819022904

साडी नेसू न दिल्याने पुण्यात १३ वर्षीय मुलीची आत्महत्या


Ganesh-9D7D2222082020114010

पुणे : गणपतीच्या दर्शनाला जाताना साडी नेसू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. देहू रोड परिसरातील शिवाजी विद्यालयात ती इयत्ता सातवीत शिकत होती. तीला गणेशउत्सवादरम्यान साडी नेसायची होती. परंतु तीच्या आईने तीला साडी नेसण्यासाठी नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरात तीने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता प्रधान (१३) असे या आत्महत्या करणा-या मुलीचे नाव आहे. तीच्या आईने साडी नेसण्यास मनाई केली. या गोष्टीचा राग धरत ती बाथरुम मध्ये रडत गेली. काही काळ तीने स्वत:ला कोंडून ठेवले. तीच्या बहिणीने काही वेळानंतर बाथरुमचा दरवाजा वाजवला. परंतु काही प्रतिसाद येत नव्हता. यामुळे घरातील सर्व सदस्य घाबरले. बाथरूमच्या दरवाजा तोडून जाण्याचा प्रयत्न करू लागले. अखेर बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी मुलगी गळ्यात स्कार्फ बांधून लटकलेल्या अवस्थेत सापडली.

हे पाहून सर्वांनी आक्रोश केला. शेजारच्यांनी पोलिसांत या घटनेची माहिती दिली, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक केले नाही.

(PRAHAAR)